top of page
Search

Arogyam Dhana Sampada!

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Oct 23, 2020
  • 2 min read

Updated: Oct 24, 2020

नवरात्राच्या वैचारिक जागरात आरोग्यम् धनसंपदेचे महत्व!


हैद्राबादच्या शास्त्रज्ञांच्या गटाने नुकतेच नमूद केलेल्या संशोधनानुसार केळीच्या बुंध्यात आणि केळीच्या कमळातील पानात चिकट द्रव पदार्थ असतो. तो खाल्याने कॅन्सर वाढवणारी ग्रंथी हळू हळू निष्क्रिय होते. म्हणून पूर्वी लोक केळीच्या पानावर जेवत. केळीच्या पानावर वाढलेल्या गरम भात आणि इतर पदार्थांमुळे केळीच्या पानातून चिकट द्रव स्त्रवू लागे. तो अनायासे अन्नात मिसळून पोटात जात असे. आता मात्र प्लास्टिक वा थर्मोकॉलच्या प्लेट्समध्ये जेवण वाढण्यात येते. त्यामुळे सर्वत्र भयानक परिस्थिती निर्माण होत आहे. या प्लेट्स नदी. नाले तलाव यात विसर्नाजित केल्यामुळे त्यांचा नाश होऊ शकत नाही. पाणी दुषित होते आणि नद्यांना अपार पूर येतो. शहरातच नव्हे खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग असलेल्या पत्रावळी, द्रोण तसेच चहासाठी मगमध्ये गरम पदार्थ ठेवण्यात येतात. पदार्थांच्या उष्णतेमुळे काही अंशी प्लास्टीक विरघळते. ते अन्नातून पोटात जाते. परिणामी कॅन्सरची शक्यता वाढते. म्हणून 'जुने ते सोने' ठरवून ते अनुसरणे योग्य ठरवण्याची वेळ आली आहे. करोना, सार्स वगैरे संकटेही सतत निसर्गाचा कोप - संतुलन बिघडत असल्याचे संदेश देत आहेत. 'आरोग्यम् धनसंपदा' हा विचार आपल्या आध्यात्माच्या अग्रभागी आहे, याची जाणीव करून देणे नवरात्राच्या वैचारिक जागरणात महत्वाचे वाटत असल्याने हा प्रपंच!


केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेली पोषक तत्वे आपसूक अन्नात मिसळतात. आरोग्याच्या दृष्टीने ही तत्वे उपयुक्त असतात. शिवाय केळीच्या पानांवर जेवल्यास डाग-खाज, पुरळ-फोड इत्यादी समस्यांचा नायनाट होतो. वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे की केळीच्या पानात विशेष प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स अँटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवल्यास हे अँटीऑक्सीडेंट आपल्या देहात प्रवेशतात. त्यामुळे त्वचा दीर्घ काळ तरुण राहण्यास मदत होते.

त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असल्यास केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्याने त्वचेचे आजार लवकर बरे होतात. म्हणून केरळमध्ये पॉलिथिवर बंदी लादण्या आली आहे. जेवणासाठी व जेवण नेण्यासाठीच्या पॅकिंगसाठी (Take Home) केळीच्या पानांचा वापर सुरू करण्यात आला आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. वेळेवर विचार करा आणि पश्चिमेतील चमकदार वस्तुंचा मोह सोडा, चकाकते ते सारे सोने नसते, ते या बाबतीतही खरे आहे, हे समजून घ्या.


नवरात्राच्या जागरात आरोग्यम् धनसंपदा या विचाराचा जागर करा. आणि म्हणा...

या देवी सर्व भूतेषु बुद्धिरुपेण संस्थिता

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

या देवी सर्व भूतेषु विद्यारुपेण संस्थिता

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

माते सर्वांच्या मनात योग्य विचार स्थापित करून सर्वांचे भले कर.

शुभम् भवतु



ree

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

Comments


FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page