top of page
Search

Jagar Vidyadhish Ganeshacha! (अथर्वशीर्ष)

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Aug 26, 2020
  • 3 min read

Updated: Aug 29, 2020

आज अथर्वशीर्षाविषयी माहिती नमूद करण्याचा मानस आहे.

थर्व म्हणजे हलणारे! अथर्व म्हणजे न हलणारे! शीर्ष म्हणजे मस्तक! म्हणून अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक! अथर्वशीर्षाच्या पठणाने बुद्धी आणि मन स्थिर होते. ज्यास हल्ली Positive thinking म्हणतात ता सश्रद्ध मनाने (स्थिर बुद्धी) केलेले कार्य यशस्वी होते. आत्मविश्वास दुणावतो. स्वभावात विनम्रता प्रगटते. त्यामुळे अडचणीत खचणे घडत नाही. समस्येत संधीचे दर्शन घडते. पण नकारात्मक मानसिकता असलेल्या अश्रद्ध लोकांना संधीतही अडचणीं दिसतात. त्यामुळे ते यशस्वी होत नाहीत. पण अथर्वशीर्षाचे पठण केल्याने मन एकाग्र होते. जातक यशस्वी होतो.

मन अत्यंत ओढाळ! इतर अवयवांसारखे ते दृश्य स्वरुपात नाही. तरी त्याची मानवी अस्तित्वार सत्ता असते. म्हणून कणखर व्यक्ती संकटांवर मात करते. अश्रद्धाचा देह वर्तमानात नि मन कधी भूतकाळात तर कधी भविष्यकाळात भरकटत असते. भूतकाळात रमणाऱ्यास भोगलेल्या दुःखाचे स्मरण अस्वस्थ करते. चित्त एकाग्र न झाल्याने कामात जीव ओतणे होत नाही. भविष्यात धावणारे मन अशक्यप्राय सुखस्वप्नात रमते. म्हणजे त्यातही चित्त एकाग्र नसते. म्हणून हाती घेतलेले काम नीट होत नाही. देह आणि मन वर्तमानात स्थिर झाल्याविना यशाचा मार्ग दिसत नाही. रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यास वाट चुकण्याचे नि अपघात होण्याचे भय निर्माण होते. तसे देह वर्तमानात नि चित्त इतरत्र भरकटले तर यशाचा मार्ग दिसेनासा होतो. यशाची वाटचाल करण्यास देह आणि मन वर्तमानकाळातच असणे - म्हणजेच मन स्थिर असण्यास महत्व असते. म्हणून अथर्वशीर्षाचे पठण करून एकाग्रतेची उपासना केल्यास ईप्सित साध्य होण्यास मदत होते, अशी गणेशभक्तांची श्रद्धा यात ध्वनित होते.

अथर्वशीर्षाचा पाठ एक, अकरा, एकवीस वा सहस्र वेळा करतात. जीवनात एकदा तरी अथर्वशीर्षाचा पाठ करण्याचा अनुभव घ्यावा. मन सश्रद्ध असो वा नसो! मन संवेदनशील असले तरी नक्की सुपरिणाम प्राप्त होतो. मनास वैज्ञानिक दृष्टिकोनाची ओढ असेल तरी अथर्वशीर्ष आवडते. आपले साहित्य क्लिष्ट वाटण्याचे मुख्य कारण आहे त्याचे अर्थघटन न होणे. वेदकाळात संस्कृत भाषा वापरात होती. त्यामुळे सारे साहित्य संस्कृत भाषेत आहे. दुर्दैवाने ही भाषा आणि साहित्य जिथे फुलले त्या भारत देशात आता संस्कृत भाषेस मृत भाषा ठरवण्यात आले आहे. तसे घडण्यापूर्वी व्यक्तिमत्वाचा विकास झालेली पिढी आता वेगाने अस्ताचलास जात आहे. पुढच्या पिढीतील काहींना मंत्र तोंडपाठ असतातही, पण अर्थ ठाऊक नसतो. फक्त ओठांवरून मंत्र घरंगळणे पुरेसे नसते. मंत्रपठण हा उपचार ठरता कामा नये. त्यात यांत्रिकता येऊ नये यासाठी प्रचलित भाषेत मंत्रांचा अर्थ समजून घेण्याची गरजआहे.


व्यक्तिमत्वाचा विकास होण्याच्या काळात आमच्या बाळकडूत महत्वाचा विचार भरण्यात आलाा. समर्थ रामदास सांगून गेले आहेत...

जे जे आपणास ठावे ते ते लोकांसी शिकवावे। शहाणे करून सोडावे, सकळ जन।।

आपण रामदासांसारखे ज्ञानी नि समर्थ नाही. पण अगदी अडाणीही नाही. म्हणून या श्लोकातील शिकवावे शब्द टाळून माझे वडील अर्धा श्लोक म्हणत - जे जे आपणासी ठावे ते ते लोकांना सांगावे. कदाचित म्हणून मलाही वाटते की आपण ढगात जाण्यापूर्वी आपल्या किंचित ज्ञानाचे अर्घ्य ज्ञानसागरात अर्पण करून जावे. गणेश ही विद्येची देवता! श्रीगणेशाचा सण साजरा करताना अथर्वशीर्षाचा जागर माय मराठीत करावा,असे वाटले. अध्यात्म म्हणजे जुने अव्यवहारू भारुड, हा समज दूर करण्याचा प्रयत्न करून आपला खारीचा वाटा उचलावा. कमीत कमी त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी हा विचार नव्या पिढीच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करावा, हा हेतू या लिखाणापाठी आहे. असो.

वैदिक संकल्पनांना विज्ञानाचे वावडे नाही. म्हणून वैज्ञानिक विचारांचा अनुरोध करणाऱ्यासही अथर्वशीर्षाची अनुभूती सुखद वाटेल.

अथर्वशीर्षातील गणेश ही संकल्पना म्हणजे समग्र विश्वातील निसर्गाच्या पल्याडचे सत्य! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच! निसर्ग म्हणजेच ईश्वर! ही संकल्पना वैज्ञानिक दृष्टीकोनास पोषक असल्याचे पटेल. निसर्गास आपण जपले तर निसर्ग आपणास जपेल हे पटेल. त्यासाठी मूळ संस्कृत भाषेत असलेल्या अथर्वशीर्षाचा अर्थ माय मराठीत जाणून घ्यायला हवा. ते आपण उद्याच्या पर्वात करणार आहोत. आज अथर्वशीर्षाची संकल्पना आत्मसात करणे पुरेसे ठरवू.

शुभम् भवतु.




शुभम् भवतु! यसाठी मूळ संस्कृत भाषेत असलेल्या अथर्वशीर्षाचा अर्थ जाणून घ्या. या पुढच्या भागात आपण माय मराठीत अथर्वशीर्षाचा सांगोपांग अर्थ जाणून घेणार आहोत.

शुभम् भवतु!

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

2 Comments


Smita Bhagwat
Smita Bhagwat
Aug 27, 2020

Thanks for showing interest. 🌷🙏

Like

Siddharth Bhagwat
Siddharth Bhagwat
Aug 27, 2020

Regularly reading or reciting Atharwashirsha after understanding its meaning is very useful for personal development. It has tremendous power to effect ourselves. Hence it‘s regular reading will be very helpful personally. Importance of understanding meaning of Atharwashirsha we will

be reciting daily or regularly is well explained in lucid language.

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page