Vechalele Moti.
- Smita Bhagwat
- Jun 4, 2021
- 3 min read
Updated: Jul 13, 2021
वेचलेले मोती.
हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि सहिष्णुता फार व्यापक आहे. परिवर्तनशील काळात सगळीकडे भेळसेळ झाली त्यास हा धर्मही अपवाद नाही. धर्म म्हणजे रीलीजन हे भाषांतर आहे काहीसे अपूर्ण वा अधुरे! आर्य ही जमात नसून सुसंस्कृत व्यक्तीसाठी वापरण्यात येणारी संज्ञा (विशेषण) आहे. आर्यांनी निर्माण केलेल्या धर्मभावनेत मुस्लीम, शीख, जैन वगैरेच धर्म नाहीत. आर्यांसाठी धर्माचा अर्थ फार व्यापक आहे. म्हणून आपण अंगभूत धर्म, स्वभावधर्म, वगैरे म्हणतो. इतरांसाठी स्वभाव रीलीजन ठरत नाही, हे जाणले तरी धर्म शब्दाचा अनुवाद रीलीजन करणे पूर्णानुवाद नाही, हे कळेल.
आर्यांच्या आकर्षक जीवनशैली नि समृद्धीच्या मोहात जगाच्या प्रत्येक भागातून लोकांचे लोंढे आर्यावर्तात आले. त्यांच्यापाठी त्यांच्या पद्धती नि रिवाजही! सहिष्णूता आणि सर्वसमावेशक वृत्ती अंगभूत धर्म असलेल्या आर्यांनी त्यांचे स्वागत केले. मग सनातन धर्मात परक्या चालीरीती मिसळल्या. ‘या विश्वातील जे जे मंगल सारे’ आत्मसात करणे उत्तमच, पण काहींनी सर्व समावेशक वृत्तीच्या अतिरेकास आर्यतेची पराकाष्टा ठरवले. ते ‘अति सर्वत्र वर्जयेत्’ हे विसरले. त्यांना परक्यांचे कथिल आपल्या सुवर्णापेक्षा चांगले म्हणण्याचा छंद जडला. नको ते रिवाज आत्मसात करण्याचाही! अगरबत्तीचा सरसकट होणारा वापर हे याचेच उदाहरण! आपल्या पूजेत. ‘दीपम् दर्शयामि, धूपम् दर्शयामि’ ही वचने आहेत. यज्ञात अर्पण करण्यात येणाऱ्या समिधा हितकर वृक्षातून तयार केलेल्या असतात. धार्मिक कार्यात वापरण्यात येणारे चंदन हे लाकूड सुगंधित असते. आपल्या कोणत्याही धार्मिक विधीत अगरबत्तीचा उल्लेख नाही. तरी आपल्याकडे अगरबत्तीस पारावार महत्व का नि कसे मिळाले? आपल्या पूजेत ‘अगरबत्ती दर्शयामि’ हे वाक्य का नाही, असाही प्रश्न पडतो. एक नव्हे अनेक अगरबत्त्यांचा झुपका पेटवून पडणाऱ्या भस्मास उदी वा विभूती नाव कसे नि केव्हा मिळाले, असा उपप्रश्नही महत्वाचा! म्हणून सर्वसमावेशक वृत्तीचा अतिरेक न करणाऱ्या विद्वानांकडून ही उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात मिळालेल्या उत्तरांचा हा गोषवारा....
आर्य देवासमोर अगरबत्ती लावणे दूर, त्यास अशुभ मानतात. कारण सनातन धर्मशास्त्रात बांबू जाळणे निषिद्ध आहे. कोणत्याही पूजा, हवन आणि होमात बांबू वापरत नाहीत. आत्माविहिन देह (पार्थिव) अग्निच्या म्हणजेच चितेच्या स्वाधीन करतानाही बांबू जाळत नाहीत. म्हणून सोयीसाठी बांबुंच्या तिरडीचा वापर केला तरी पार्थिव तिरडीसह सरणावर ठेवत नाहीत. तिरडीचे बांबू चितेत जाळत नाहीत. या कृतीपाठी भक्कम शास्त्राधार आहे. आपल्या धर्मशास्त्रातील कोणतीही कृती अवडंबर नाही. त्यापाठी शास्त्रशुद्ध विचार आहे. आजच्या भारतीयांना तो ठाऊक असो वा नसो, प्रत्येक कृती शास्त्रिय आहे, अशी खात्री व्यक्त करण्यात येते. आर्य समाज बांबू जाळणाऱ्यास पितृदोष लागतो, असे म्हणतो. प्रत्येक कृतीचे शास्त्रशुद्ध निरुपण सच्चा अभ्यासकास ठाऊक असणे अभिप्रेत आहे. म्हणून बांबू जाळणाऱ्यास पितृदोष का लागतो, याचा शोध घेण्याची गरज भासली. त्या संवादातून वा वैचारिक मंथनातून मिळालेले हे नवनीत! वेचलेला तेजस्वी मोती! बांबू न जाळण्यामागे कोणता शास्त्रशुद्ध विचार आहे ते विशद करणारा! अगरबत्ती लावण्याची संकल्पना का नि कशी स्थापित झाली, तेही समजावणारा!
बांबूत शिसे आणि जड धातू असतात. बांबू जाळल्यास शिसे नि जड धातुंचे ऑक्सिडेशन होते. परिणामी त्यांची भस्मे - ऑक्साइड बनतात. शिशाचे भस्म (Neurotoxic) मज्जासंस्थेस आणि जड धातुंची भस्मे (Hepatotoxic) यकृतास अपायकारक असतात. अगरबत्ती बनवताना सुगंधासाठी phthalate रसायनाचा उपयोग करतात. ते आहे Phthalic ॲसिडचे ester आहे! श्वासाच्या माध्यमातून ते देहात घुसते! मंद विषासारखे मूत्रपिंड (किडनी) आणि यकृतास (लिव्हर) निकामी करू लागते. दुबळ्या देहासाठी कॅन्सर आणि पक्षाघातासही निमंत्रण धाडते.
अगरबत्तीसाठी बांबूचे लाकूड वापरतात. त्यावर Phthalic Acidचा लेप असतो तो सुगंधाची निर्मिती करतो. अगरबत्तीच्या धुरातून सुगंधाबरोबर न्यूरोटॉक्सीक आणि हिपॅटोटॉक्सिक रसायने श्वासातून देहात प्रवेशतात. म्हणजे अगरबत्तीचा सुगंध न्युरोटॉक्सिक आणि हिपॅटोटॉक्सिक मंद विषे शरीरात पोहोचवतो. हिपॅटोटॉक्सिक रसायनाची किंचित मात्राही यकृतास अपायकारक असते. म्हणून आर्यांनी निर्माण केलेल्या धार्मिक विधीत सर्वत्र धूप दीप आणि नैवेद्यच असतात.
देशात अगरबत्तीचा वापर इस्लामच्या आगमनानंतर सुरू झाला. ते मूर्तिपूजा निषिद्ध समजणारे! त्यांच्या मजार वा थडग्यावर अगरबत्त्यांचा मोठा झुपका जळत असतो. सुगंधाच्या मोहात आपल्याकडे सर्वसमावेशक या गोंडस नावाखाली अंधानुकरण झाले. आपल्या देवघर वा देव्हाऱ्यात अगरबत्तीचा प्रवेश झाला. पूजेत फार वेळ जात नाही. म्हणून मंद गतीने नि मर्यादित वेळ, ही अपायकारक रसायने श्वासातून देहात जातात. तरी थेंबे थेंबे तळे साचे, सारखे हे मंद विष देहात आपले कार्य सुरू करतेच. प्रतिकारशक्ती (रेझिस्टन्स पॉवर) नसलेल्या व्यक्तींच्या बाबतीत निर्णायक दुष्परिणाम लवकर दिसू लागतो.
इतर धर्मीयांना मान देणे चांगले, पण चांगुलपणाचाही अतिरेक वाईट, हे कळले पाहिजे. सनातन धर्मातील प्रत्येक कृती शास्त्रसंमत आणि विज्ञानाधारीत आहे. कारण या धर्माची निर्मिती विशिष्ट समाजासाठी नसून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी झाली आहे. काहीही न जाणता सनातन शब्द टिकास्त्रासारखा वापरणे सोडून प्रत्येक कृतीपाठचे शास्त्रीय कारण जाणून घेतले पाहिजे. आपल्या काही गोशाळा धूपकांडी बनवतात. भाकड गावरान गायीच्या शेणापासून या धूपकांड्या बनतात. त्यांच्या धुरातून प्राणावायू बाहेर पडतो. म्हणून तशा धुपाचा वापर करावा. वरवरचा विचार करणाऱ्याने ते प्रतिगामीपणाचे लक्षण ठरवले तरी! ते आरोग्याचा आग्रह धरणे आहे, हे समजून घेतले पाहिजे.
म्हणून घ्यावा, 'जे जे आपणास ठावे ते ते इतरांना सांगण्याचा वसा!' आपण विद्वान पंडित नाही, हे स्वीकारून इतरांना शिकवावे असे न म्हणता मी सांगावे असे म्हणते. प्रत्येकास कळलेली माहिती एकत्रित झाली तर थेंबे थेंबे तळे साचे न्यायाने ज्ञानाची पाणपोई निर्माण होण्याची शक्यता मला रोमहर्षक वाटते. तुम्हाला ती पटल्याचे कळल्यास सोन्यास सुगंध प्राप्त झाल्याचा मला आनंद होणार आहे.
शुभम् भवतु.


खरं आहे. हे ठाऊक नसण्यात काही दिवसांपूर्वी माझाही समावेश होता. वाचनाच्या छंदामुळे असे मोती सापडतात आणि त्याची इतरांवर उधळण करण्याचा मला छंद आहे.
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.
अगरबत्यीचा वापर हिंदू लोक सरसकट करतात. पण हिंदू धर्मात कोणत्याही पूजा विधीत अगरबत्तीचा वापर करायचा नसतो, हे बहुतेक लोकांना ठाऊक नसते. हिंदू विधी किंवा रीतीरीवाजात अगरबत्तिचा वापर का करायचा नाही या विषयी छान माहीती दिली आहे. समंजस लोकांना हे वाचून अगरबत्ती उपयोगात न आणण्याचं वैज्ञानिक कारण कळेल. आभार.