Lalita Panchami
- Smita Bhagwat
- Oct 21, 2020
- 2 min read
Updated: Oct 21, 2020
ललिता पंचमी
शारदीय नवरात्राच्या वैचारिक जागरात ललिता पंचमीच्च्याया निमित्ताने एका अमराठी मित्राने अज्ञात पाठवलेल्या छान कवितेच्या भावानुवादाचे हे मुक्तक सादरकरण्याचा आनंद आगळाच...
७० हून अधिक वर्षांपूर्वी एका गुजरात्याने देशास इंग्रजांपासून मुक्त केले!!
६८ वर्षांनंतर एका गुजरात्याने देशास काँग्रेसपासून मुक्त केले!!
पहिला गुजराती नोटांवर विराजमान झाला तरआताच्या गुजरात्याने वोटांवर हक्क स्थापन केला!!!
अरे मित्रा मला खिडक्या उघड्या ठेवून डोळस नजरेने बघू दे....
माझ्या देशाच्या नव्या प्रतिमेची निर्मिती होत आहे !!!
पुन्हा आझादी प्राप्त केलेल्या देशाच्या प्रतिभेस धुमारे फुटू लागले आहेत!!
आधी इंग्लंडच्या राणीसोबतीत नि मग इटलीच्या नोकराणीसोबतीत
जे वाचायला शिकले नाहीत ते आता पुस्तक मागत आहेत!!!
ज्यांनी स्वतः ना कधी हिशेब ठेवला की कुणास दिला,
ते आज हिशेब मागत आहेत. स्वतः साठ वर्षात देशाचा विकास न करणारेे, उद्दाम
मोजक्या वर्षात केलेल्या विकासाचा हिशेब मागत आहेत?
आज गाढवं मागत आहेत गुलाब नि चोर लुटारू मागताहेत न्याय?
साठ वर्षं सातत्याने देश लुटत होते, तेेच हिशेब मागताहेत, मोजक्या वर्षात केलेल्या विकासाचा!
प्रथमच एका सर्वोच्च नेत्याने गंगेची आरती केली,
जिथे आजवर नेत्यांना स्वपरिवाराच्या लोकांच्या समााधीवर फूले ठेवलेलीाच बघितली!
स्वतंत्र देशात हल्लीच मातृभाषेत भाषणे होत आहेत. बाकी तोवर न्यूनगंडाने पछाडलेले अभिनेते नेते
रट्टा मारून शिकलेल्या इंग्रजीतच र ट फ करत.
इतकी वर्षे एकाच परिवारातील मूर्ती देव्हाऱ्यात बसवल्या होत्या. आता मात्र...
सामान्य पण सुसंस्कृत नागरिक सर्वोच्च नेता बनला आहे.
तोच मायभूमीची माती मस्तकी धारण करताना दिसतोे! बाकी तोवर तर
नेते इटालियन सँडल्सची माती चाटताना दिसत होते!
आता देशाचे दुःख पाहून डोळे पाणवलेला सर्वोच्च नेता दिसतो आहे!
तोवर "माझ्या पति वा पित्याची हत्या झाली" असा गळा काढत मतांची भीक मागणारेच दिसत!
हल्लीच पाकिस्तानवर जरब बसवलेली दिसत आहे! तोवर यवनांना भिणारे नेतेच दिसत होते!.
हल्लीच अमेरिका भारतमातेसमक्ष झुकू लागली आहे! तोवर सारे निवेदने धाडणारे भेकडच दिसले!
मित्रांनो म्हणून जागे होऊन मायभूमीची हाक ऐका
ती म्हणते आहे - शक्तिपर्वात वैचारिक जागर करा!
काय योग्य नि काय अयोग्य ते गंभीर विचारांती ठरवा!
मा शारदा, मा सरस्वती तसेच मातृभूमीचा जयजयकार करा!
आदराने वंदे मातरम् म्हणत निखळ शक्तीची आराधना करा आणि
आपापल्या मित्रांनाही वैचारिक जागर करण्यास उद्युक्त करा!
मनापासून म्हणा...
या देवी सर्व भूतेषु मातृरुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
या देवी सर्व भूतेषु शक्तिरुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
या देवी सर्व भूतेषु बुद्धिरुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
या देवी सर्व भूतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
या देवी सर्व भूतेषु विद्यारुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
माते सर्वांना योग्य विचार देऊन सर्वांचे भले कर.
शुभम् भवतु
गुहागरची दुर्गादेवी. (फोटो सौजन्य श्री. सुभाष भागवत.)



धन्यवाद
काव्य फार छानरितीने भारतीयांना देशात काय परिस्थिती होती आणी आहे ते ध्यानात आणुन देत आहे.
लोक जागृती चे काम छान केले आहे. आशा आहेकी लोक जागृत होतील.