top of page
Search

Sita's agony.

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Jun 11, 2020
  • 2 min read

Updated: Jun 12, 2020

उपेक्षितेचे अंतरंग


माझा जन्म मुलांच्या प्रश्नांचे स्वागत करणाऱ्या घरात झाला. कदाचित म्हणून बालपणापासून इतरांना अवास्तव वाटावे इतके मला प्रश्न पडत. सुरुवातीस मी ते माझ्या वडील माणसांना विचारत असे. पुढे मला वाचनाचा छंद लागला नि मी स्वतः उत्तरे सोधू लागले. काही प्रश्नांची उत्तरे मला सापडली, पण काही उत्तरे मला पटली नाहीत. उलट मूळ प्रश्नांना त्या उत्तरांमुळे उपप्रश्न फुटले. सत्तरी उलटल्यावरही ते मनातून दूर झाले नाहीत. त्यात सीतात्याग ही मन अस्वस्थ करणारी बाब! विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या प्रश्नाचा उहापोह झालाही!

स्व. वसंत बापट रचित एक गाणे ऐकण्यात आले. त्या विचाराशी माझ्या नवतरुण मनाची तार जुळली. तरी शेवटच्या 'तिला सांभाळा' या शब्दांनी अस्वस्थ केले आणि कसे सांभाळणार? असा त्यास उपप्रश्न फुटला. तरी रामायणात नसलेले हे गाणे तेव्हा मी प्रभावी स्वरात कॉलेजसह इतरही रंगमंचांवर गाईले. तार्किक विचारास प्राधान्य देणाऱ्या काहींना ते खूप आवडत असे. ते हे गाणे....

'जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला, समजला म्हणावे न्याय तुझ्या सीतेला

अग्नीत घेतली उडी उजळली कुडी

पटविले तेव्हा होतास तिथे तू देवा,

केलास न्याय परि उलटा ठरले कुलटा

केलीस सफळ मम सेवा

शोभले तुझ्या वंशास दिगंत यशास चढेल तजेला ।१।

जा सांग जानकी अजुनी राही जिवंत

जो रघुवंशाचा अंश तिच्या उदरात

तोवरी प्राण कोंडिल देहकोशात

राणीची भिकारीण आज झाले रघुराज तिला सांभाळा ।२।

१) रजकाच्या आरोपास महत्व देऊन रामाने सीता गर्भवती पत्नीस लक्ष्मणास वनात सोडून येण्याचा आदेश दिला. यास त्यागाची चरमसीमा मानण्यात आले. ते माझ्या नवतरुण मनास रुचले नाही. सत्तरी ओलांडल्यावरही त्या नापसंतीवर चरा उमटलेला नाही. हे गाणे निर्माण झाले त्या आधीपासून काही प्रश्न मला अस्वस्थ करत. मला ही घटना पतीने पत्नीची जबाबदारी बिनमहत्वाची समजून तिकडे कानाडोळा करणे वाटे, इतकी वर्षं मनात दडपलेले प्रश्न ब्लॉगवर व्यक्त करावेसे वाटले. सीतेच्या रावणाकडे राहण्याचे भांडवल करून स्वपत्नीस घराबाहेर काढणाऱ्या रजकाचा दुसरीशी अनैतिक संबंध होता, असे वाचनात आले, म्हणून विशेष!

२) रामाचे एकपत्नी व्रत होते. रजकाचे नव्हे. कर्तृत्वान लोक (दशरथानेही) अनेक विवाह करत. ज्यांना अधिक विवाहाची जबाबदारी - म्हणजे खर्च परवडत असे असे सामान्य लोकही अधिक विवाह करत. मग न्यायप्रिय राजाने रजकास पहिल्या पत्नीची आर्थिक जबाबदारी पेलून दुसरा विवाह करण्याचा आदेश का दिला नाही?


३) प्राण जाय पर वचन न जाय असा डांगोरा पिटणाऱ्या रघुवंशीय रामाचे राजा होण्यापूर्वी लग्न झाले होते. म्हणजे राजा होण्यापूर्वी त्याने 'नाति चरामि' ही शपथ घेतली! त्या शपथचे काय झाले? प्रजापालक राजाने सीतेच्या पतीने घेतलेली शपथ दुर्लक्षून प्रजापालनासाठी तिचा त्याग करणे कसे योग्य ठरवले? प्रजेच्या मतास महत्व देण्याच्या राज कर्तव्याकडे बोट दाखवताना त्याने लग्नात घेतलेली शपथ नजरेआड केली असेल तर प्राण जाय पर वचन न जाय हे कसे योग्य ठरते? की त्रेतायुगातच राज्यकर्त्यांनी सोयीस्करपणे प्रजेची मते विचारात घेण्याची सुरूवात केली होती?

या विषयी तुम्हाला काय वाटते?

आभार.

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

1 Comment


Salyl Bhagwat
Salyl Bhagwat
Jun 14, 2020

I wonder if this poem is based on Shri Svargiya Vasant Bapat's feelings/imagination or is in fact described in Valmiki's original Ramayan. If I remember this right, Sita-Ram were simply executing on a prior "shap" so all the cause was just a nimitta. (not sure. needs to be checked). So, my over simplified view of this is that if Ramayan is a divine epic and Sita-Ram its central Avatari figures with Ram an avatar of the omniscient lord of the universe and Sita being avatar of the shuddha Lakshmi, then all decisions and behaviors must have been superlative (with all things considered... there is generally more than what strikes the human eye).

If that is not the premise then it…

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page