top of page
Search

Ramnavmi.

Writer: Smita Bhagwat
Smita Bhagwat
Apr 20, 2021
3 min read

वेचलेले मोती. ३


आपल्याकडे खूप घरात सायंकाळी रामरक्षा म्हटली जाते. पण संस्कृतमध्ये लिहिलेली रामरक्षा नीट समजत नाही. वाचनाचा छंद जोपासताना ठाण्याच्या श्री. विनायक परांजपे यांनी रामरक्षेचा मराठीत अनुवाद गवसला. तोच या मौक्तिक माळेतला तिसरा मोती.


ज्यांनी रचिला मंत्र रामरक्षा जो वाढवी ज्ञान बुध्दीचीही कक्षा जो देतसे सगुण भक्तीचीच दीक्षा लवून नमन माझे बुधकोशिकांना समक्षा.....१

आता करू या श्रीरामाचे ध्यान जटाभाराने सुशोभते पावन वदन तनु अंलंकारीली सुंदरशा आभूषणे मेघश्याम कांती रूपडे देखणे...२

चापबाण धरी अजानुबाहु रामराया बद्धपद्मासनस्थ जो पितांबरे सजे काया अंकी बैसलेल्या सीतेचे मुख अवलोकितो नव उदित कमळापरी नीत प्रसन्न भासतो... ३

कोट्यवधी श्लोकांच्या इतके श्रीरामाचे चरित्र विशाल

केवळ एकच अक्षर पुरते पाप क्षालनासाठी खुशाल....४

किरीट जटांचा मस्तकी विराजे निलोत्पल वर्ण तुज साजे लक्ष्मण सीता श्वासची ज्याचे ध्यान करावे रघुनाथाचे.....५

ज्याला नाही जन्म व्यापक तो देव जगा उध्दरण्या भू्वरी घेई ठाव देहाच्या मर्यादा भोगाच्या मर्यादा सहज लीलेने नाशी तो आपदा..६

पापांचे क्षालन रामरक्षा करी पाठकांची होई सारी इच्छा पूरी हाती आयुधेही सारी विश्व पावे लोप राक्षसांच्या नाशासाठी मनी धरी कोप.....७

रघुकुळश्रेष्ठ करी शिराचे रक्षण दशरथपुत्र करी भाळाचे रक्षण दृष्टीला रक्षितो कौसल्येचा बाळ श्रुतींना पोसतो नि करीतो सांभाळ......८

श्वासाची नासिका जपे यज्ञ जपणारा चेह-याचे हित जपे प्रिय जो सुमित्रा.....९

जिव्हेला संरक्षिती ज्यांच्या देही ईरा असे

कंठ रक्षतील मोदे भरतहृदयी जो वसे.....१०

खांद्याना बळकटी देती दिव्य शस्त्रांना जो वाही शिवचापाला दुभंगणारा रक्षी भुजा काळडोही......११

हातांचे रक्षण करतील करुणेश जानकीपती हृदयाला रक्षतील परशुरामाचे अधिपती.....१२

नाभी माझी रक्षिसी रामा जांबुवंता जो देई अभय कंबर माझी बळकट करीसी सुग्रीव तुजमुळे हो निर्भय....१३

जांघांना बलवान करतील हनुमानाचे प्रिय प्रभुवर असूर अंत करणारे करतील मम मांड्यांना अती कणखर...१४

गुडघे पोट-या भक्कम करतील सेतू घडवीणारे दशानन अरी बिभीषणाचा उत्कर्ष करणारे दोन्ही पाऊले, खोटा तारी......१५

रक्षी तू रक्षी तू माझ्या शरीरा हे श्रीरामा ! दयाघना !! अचलही मन अन् बुध्दी द्यावी तारी तू तारी तू अज्ञजना.....१६

रामबलाचे रामकवच हे पुण्यात्मा पाठक गाई सुखी दीर्घायु संतती धारक विजयी आणि विनयी होई....१७

रामनाम जपणारे सगळे भक्कम कवचा धारण करीती ज्यांच्या मनात छद्म कपट ते धास्तावून पळूनी जाती.......१८

रामनाम जपा जपा रामनाम रक्षण करतील दिशा दाही कंठी मंत्र ज्याच्या धारण होईल सुखशांतीची मिळे ग्वाही ......१९

इंद्राच्या वज्राहूनी काटक चिलखत,मंत्र तुम्हां देते मंगलमय अन् अंकित जग हे तुम्हा भोवती फेरे धरते.......२०

स्वप्नी येऊन श्रीशंकर सांगे अवीट गोडीची रामरक्षा सकाळी उठोनी लिहून काढीली बुधकोशिकाने ती दीक्षा......२१

देवाधिदेव करीतो मोचन संकटांचे हृदयी जन धरीती नाम फुकाचे माझा राम आत्माराम मनी मानसी हो विश्राम......२२

दशरथ नंदन भ्राता दोघे काळवीटाचे वसन तयांचे कंदमुळे नि फळे भक्षिती इंद्रियांचे दमन करीती......२३

ब्रह्मचर्य अन् तापस वृत्ती प्राणीजनांचे आश्रय होती धनुर्धाऱ्यांमधी श्रेष्ठच असती असूर कुळाचा नाशही करती..२४

रघुकुळींचे जेष्ठ श्रेष्ठ हे सदैव अमुचे रक्षण करीती सज्ज धनुष्ये अक्षय भाता रघुराया तू अमुचा त्राता लक्ष्मणासह पुढती होऊनी रक्षी रक्षी तू अमुचा कर्ता.....२५

शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले श्रीरामांनी पुलकित केले लक्ष्मणासम बलवंत शूरवीर अधीरपणाने शब्दही झेले......२६

काकुस्थांचा कौशल्येचा राम पूर्ण पुरूष हा कुलीन शाम मंत्रजपाचे करतील पाठ यज्ञ अश्वमेघही सोडील वाट यशमार्ग हा पुण्यची देईल स्वर्ग धरेवर खाली येईल......२७

दुर्वदलांसम नितळ राम राजीवलोचन जानकीराम तेजोमय तव मधुर नाम मुखात येता मिळे मोक्षाधाम..२८

सुंदर, श्रेष्ठ हे सीताराम रघुकुळजेष्ठा करुणाकर नाम लक्ष्मणभरताग्रजा हे गुणखाणा शांतीदूता तुज नम्र प्रणाम....२९

रामचंद्र तू रामभद्र तू तू श्रीराम तुजसह बृहस्पतीस वंदन रणश्रेष्ठ तू रघुकुळटीळक लोण्यासाठी नामाचे मंथन.....३०

चरण स्मरण तव सदा करावे वाणीने गुणगान करावे अष्टांगी मम शीर नमावे मी पण माझे संपूनी जावे....३१

जननी जनक तू हे श्रीराम स्वामी सखा तू ,तू अभिराम दयाघना तू आत्माराम अन्य दुजाचे उरे न काम....३२

उजव्या हाती लक्ष्मण/डावीकडे सीता मारुती पुढता/वंदिन मी//...३३

कारुण्याची मूर्ती/न्यायाची तू कीर्ती गांभीर्याची पूर्ती/वंदिन मी//...३४

मनाच्या वेगाला/मागे तो टाकतो बुध्दीमंताना जिंकतो/मारुती तो//३५

बुध्दीमंतांत वरिष्ठ/रामसेनेचा तो ज्येष्ठ/पवनपुत्रा नम्र/प्रणिपात// ३६

आम्रतरूवरी/बैसला वाल्मिकी कोकीळ रामनाम अखिळ/बोलतसे//३७

वाल्मिकी ऋषीला/नमन करावे घ्यावे मनोभावे/रामनाम//३८

रामाहूनी नाही/कोणी ते कुशल चित्ती तो विशाल/ रामराया//३९

चित्तवृत्ती माझी/हेलावून जावी वाट मला दावी/उद्धरी गा//४०

वरानना उमेला/शंकर सांगतो रामाला मी ध्यातो/अखंडित//४१

चढते वरती/राघवाचे नाम विष्णु सहस्रनाम/खाली जाते//४२

बुधकौशिकांनी/रचीलेल्या ओळी खांद्यावरची झोळी/उघडावी//४३ रामरक्षेचे गा/ पूर्ण झाले गान पदरी घ्यावे दान /भाविक हो//४४

श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु

शुभम् भवतु

 
 
 

Recent Posts

See All
So long, Mother....

There are certain beings who have walked on this earth just to balance out the residual effects of their past karma. They are neither interested in wealth nor power nor fame. As soon as they are done

 
 
 
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 

2 Comments


Smita Bhagwat
Smita Bhagwat
Apr 21, 2021

धन्यवाद सिद्धार्थ

Like

Siddharth Bhagwat
Siddharth Bhagwat
Apr 21, 2021

रामरक्षा विषयी माहिती वाचल्याने आर्थ नीट समजला. रामरक्षा समजून उमजून उच्चार केले पाहिजेत. मराठी भाषा नीट नसेल येत त्यानचा साठी ही माहीती उपयोगी होईल..

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page