So long, Mother....

There are certain beings who have walked on this earth just to balance out the residual effects of their past karma. They are neither interested in wealth nor power nor fame. As soon as they are done with their भोग, they just leave but, in the process, through their work and through their presence, they show their स्वरूप to certain lucky few (such as me) who know that they were blessed to be in presence of a Divine being.
On July 21st, 2026, one such being, my Mother, माझी personal देवी भागवत, મારી સૌથી વ્હાલી વ્યક્તિ, પરમ ધામે જવા નીકળી ગઈ. मम्मी जेव्हा ‘वेदमंत्राहून आम्हां, वंद्य वंदे मातरम्’ म्हणायची तेव्हाचा तिचा भाव आठवला कि वाटतं कि तिने तिचा देह भारतात त्यागला ह्यात काही आश्चर्य नाही. तिने काय योग निवडला! दुर्गाष्टमी च्या दिवशी, तिच्या आवडत्या वारी (मंगळवार), तिच्या गणपती चा आवडता अंक २१असलेली तारीख आणि देव शयनी च्या आधी! She must have planned it and most likely had a premonition because just a day before, her caretakers witnessed that she was telling me (her son) to rush immediately and not delay her अंतिम संस्कार.
मातोश्रींची आज्ञा मिळताच, मी लगेच निघालो आणि पोचताक्षणी तिनें त्यागलेल्या देहाच्या चरणी उभाराहून मी आपोआप ‘या देवी सर्वभूतेषुमातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।’ स्मरले. तिच्या चेहऱ्यावर काळाचा केव्हा वेदनेचा लवलेश स्पर्श न्हवता! So apt for a noble-headed person! माझ्या कानात तिच्या मंजूळ आवाजात म्हंटलेले ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही॥’ ठळक आहे.
मम्मीचं वैखरी वर इतकं प्रचंड आणि कमालीचं प्रभूत्व होतं कि तिने म्हंटलेले भगवद गीतेतले श्लोक भगवान च्या rhythm मध्ये असतील असेच वाटायचे! माझ्या सुदैवाने मला तिच्या तोंडून तिचे लिखाण ऐकायला मिळाले (audio books fail to come anywhere close). तीने ‘कृष्ण.... कृष्ण.... कृष्ण....’ उच्चारले कि सगळं वातावरण बदलून जात आणि जणू काही श्री कृष्णाची प्रचिती घडून यायची! तिनें अलकनंदा व कालिंदी चे वर्णन केले कि आपण द्वापर युगात त्या नद्यांमध्ये शुचिरभूत होऊन आल्याची अनुभूती व्हायची!
अत्यंत संवेदनशील, प्रगल्भ आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या ह्या मातेला जेवढे superlative adjectives द्यावे ते कमीच आहे. Just listen to her favorite अभंग ‘जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥’ and you’ll get the gist of how she lived her life.
मम्मी ने दिलेले संस्कार आणि इतक्या सगळ्या उत्कृष्ट आठवणी आहेत कि काय सांगू! ह्या सगळ्याच्या पलीकडले म्हणजे एक हि शब्द न उच्चारता हि माझी जननी मला काय काय अध्यात्म शिकवून गेली!
माझ्या ह्या आत्मीय गुरुचे अस्थी विसर्जन माझ्या हातून गुरु पौर्णिमेला गंगे मध्ये झाले हा अत्यंत योग्य योग! I’m extremely fortunate that I had such a Mother….
मम्मी चा अत्यंत उच्च अध्यात्मिक दर्जा असल्यामुळे तिला शत शत वंदन करत विदाय देताना तिचा भगवद गीतेतला सगळ्यात लाडका श्लोक म्हणतो….
‘न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥’


Comments