top of page
Search

Teachers day & Sankasht Chaturthi

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Sep 5, 2020
  • 2 min read

आज ५ सप्टेंबर. शिक्षक दिन आणि श्रीगणेशाची संकष्ट चतुर्थी !

भारताचे दुसरे राष्ट्रपती स्व. राधाकृष्णन् यांच्या स्मरणार्थ देश शिक्षकदिन साजरा करतो. आज संकष्ट चतुर्थीही आहे. गणरायाचे पर्व नुकते संपले आहे. अशावेळी या शुभयोगाचे सायुज्य साजरे करण्यास अनोखे महत्व आहे.

गणेश म्हणजे चौसष्ट विद्यांची देवता! म्हणून काही शिकण्याच्या संकल्पास गणेशाची प्रतिक पूजा ठरवतात. जे शिक्षक गुरूच्या कक्षेस पोहोचले त्यांना वंदन करताना समर्थ रामदास स्मरतात. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही आधीपासून त्यांनी जनजगृतीचे महत्व जपले. विविध निमित्ताने लोकांना एकत्र करून त्यांनी समाजात हिंदवी स्वराज्याची संकल्पना रुजवली. केवळ शिवाजी महाराजांचे गुरु न ठरता ते राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी बनले. म्हणून संकष्ट चतुर्थी आणि शिक्षक दिनाचे सायुज्य साजरे करताना त्यांची वचने स्मरू या.   ।। दास-वाणी ।। 

जाणत्यापासीं परीक्षा सिकणे ।   जाणत्यापासीं तालिम करणे ।  जाणत्यापासीं पोहणें  ।  अभ्यासावें  ।।  जाणता बोलेल तैसें बोलावें ।  जाणता सांगेल तैसें चालावें ।  जाणत्याचे ध्यान धरावें ।  नाना प्रकारीं  ।।  

दासबोध  :  १८/०२/०८-०९  अश्वपरीक्षा, गजपरीक्षा, रत्नपरीक्षा या फक्त तज्ञ माणसाकडूनच शिकाव्यात. मल्लविद्येचे शिक्षण हे उस्तादाकडूनच घ्यावे. अनुभवी व्यक्तीकडूनच जलतरणाचे धडे घ्यावे. जाणता म्हणजे ज्याच्या ज्ञानाचा घडा भरलेला असतो, तो! तो बोलेल ते विचारपूर्वक आणि परिणामकारक असते!  त्यामुळे त्याची भाषा आपण जशी च्या तशी वापरावी. ज्ञानी माणसाच्या चालीवर नि:शंकपणे पावले टाकावी. कारण ती यशाकडे नेणारी पाऊलवाट असते. ज्ञानी माणसाच्या प्रत्येक कृतीवर आपण बारीक लक्ष ठेवावे. त्याने आखून दिलेल्या मार्गावर निर्धास्तपणे चालावे कारण तिथे सुख समृद्धी व चिरंतन समाधान स्थिरावते!

आर्यावर्त म्हणजे ज्ञानाचा सागर! शतकानुशतके तिथे अनेक गुरूंनी जनजागृती केली आहे. ऐतिहासिक काळातच नव्हे तर आधुनिक वाल्मिकी हे बिरुद पावलेल्या ग.दि.माडगुळकरांनी उपदेशात रंजकत्वाची भर घातली. शिक्षक दिनी ते गुरूचे महत्व सोप्या रसाळ भाषेत काव्यात गुंफून त्यांनी जे सांगितले आहे, त्याचे स्मरणही सुखद आहे. कुंभारासारिखा गुरु नाही रे जगांत  | वर घालितो धपाटे , आत आधाराला हात ॥धृ॥ आधी तुडवी तुडवी, मग हातें कुरवाळी | ओल्या मातीच्या गोळ्याला येते रूपाची नव्हाळी | घडे जाती थोराघरी घट जाती राउळांत ॥१॥ कुंभारासारिखा........ कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ | हात धरितां गुरूने ज्याची त्याला लाभे वाट |  शिष्य पावतो प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात ॥२॥ कुंभारासारिखा........ 


अनेक ज्ञात आणि अज्ञात गुरूंना आपण वंदन करू. नम्रपणे संकटविनाशक श्री गणेशाकडे सुबुद्धी आणि सदाचाराच्या प्राप्तीसाठी याचना करून आजचा हा सायुज्याचा शुभयोग साजरा करू.


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।


शुभम् भवतु. ूपच छान तरलता भावपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे. मनःपूर्वक अभिनंदन. खूपच छान तरलता भावपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे. मनःपूर्वक अभिनंदन. खूपच छान तरलता भावपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे. मनःपूर्वक अभिनंदन.






 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

6 Comments


Smita Bhagwat
Smita Bhagwat
Sep 07, 2020

Thanks Siddharth.

Like

Siddharth Bhagwat
Siddharth Bhagwat
Sep 07, 2020

Importance of GURU in life of human beings is great. Without Gurukrupa ,one cannot achieve desired results. However task of finding True GURU is not easy. Swamy Vivekanand has mentioned the qualities of true GURU. What is importance of GURU in our life is nicely explained.

Like

Smita Bhagwat
Smita Bhagwat
Sep 07, 2020

होय. फक्त तो चमत्कार नसून ज्ञानाची कास धरून कसा दाखवता येतो, तेही सक्षम गुरूने सांगणे गरजेचे असते. त्यामुळे शिष्य अंधश्रद्ध होणे गुरु टाळू शकतो. गुरु दीक्षा देतो. म्हणजे शिष्याची क्षती (त्रुटी - उणीव) दूर करून आपली दीप्ति स्थापित करतो! ते केवळ ज्ञानी गुरु करू शकतो! गुरु ओळखण्याची एक रीत आपल्या 'महाराष्ट्र धर्म वाढवावा' या पुस्तकात आहे. ती एका अवलियाच्या तोंडी आहे. त्या रीतीने पारख करून एका शिष्याने समर्थ रामदास यांना गुरु केले आहे. तो प्रसंग इथे लिहिता यावा इतका छोटा नाही. म्हणून इथेच थांबते.🌷❤️

Like

Salyl Bhagwat
Salyl Bhagwat
Sep 07, 2020

मी स्वामी विवेकानंदांची पूर्ण कामे वाचून अनेक दशके झाली आहेत जेणेकरून मला आठवत असलेल्या अचूकतेची दोनदा तपासणी करणे आवश्यक आहे. अध्यात्मिक गुरु ओळखण्या बद्दल च्या संबंधित, माझ्या आठवणीतील त्याचा सार हा आहे: साधकयाच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील अनोख्या घटना गुरुंनी अचूकपणे सांगण्यास सक्षम असावे. साधकाच्या जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यात गुरूंना मदत करता आली पाहिजे. गुरूंना साधकास काही संबंधित चमत्कार दाखवता आला पाहिजे.

Like

Smita Bhagwat
Smita Bhagwat
Sep 06, 2020

मग लिही ना! वाटल्यास इंग्लीशमध्ये लिही. मला आठवत नाहीय, म्हणून सांगते. वाटल्यास इ मेल कर. वाट बघते.


Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page