Wife of Bharat.
- Smita Bhagwat
- Jun 4, 2020
- 2 min read
Updated: Jun 4, 2020
भरतपत्नी मांडवी
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रामायणातील महत्वाच्या बाबीचा वर्तमान संदर्भात विचार करण्याचा प्रयत्न झाला. लक्ष्मण रामासंगे गेला. सीताही "जेथे राघव तेथे सीता," असे म्हणत रामाच्या पावलावर पावले टाकत वनात गेली. पण त्याच न्यायाने "जेथे लक्ष्मण तेथे उर्मिला," असे नाही म्हणू शकली. लक्ष्मणाने तिला सासु-सासऱ्यांची सेवा करण्यास अयोध्येस राहण्याचा आदेश दिला. तिच्या त्यागाची महती "उर्मिले त्रिवार वंदन तुला," या गीतात गाण्यात आलीा. पण भरतपत्नी मांडवी मात्र उपेक्षिताच ठरली, हा विचार मला व्यथित करतो.
रामास परत बोलवण्यास भरत वनात गेला. त्याने परोपरीने विनवूनही रामाने चौदा वर्षे पूर्ण केल्याविना परतणार नाही, असे निक्षून सांगितले. म्हणून त्या काळात राज्यकारभार करण्यास भरत तयार झाला. पण त्याने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून कारभार करण्याची अट घातली. अयोध्येस परतलेल्या भरताने आपला बेत सविस्तर जाहिर केला. राम आणि भरताचे गुणगान करून सर्वांनी धन्यतेचा अनुभव केला. पण वास्तवात हा प्रश्न इथे संपला नाहीा. भरत नगरीबाहेर सन्यस्त जीवन जगणार असल्याने त्याची पत्नी मांडवी त्याच्यासंगे सन्यस्त जीवन जगण्यास राज प्नासाद सोडण्याची तयारी करू लागली. पण...
भरताने तिला रोखले. मातृसेवा त्याचे पुत्रकर्तव्य होते. नगराबाहेर राहून ते तो करू शकणार नव्हता. पतीच्या अनुपस्थितीत पतीची जाबाबदारी पार पाडणे हे अर्धांगिनीचे कर्तव्य असते, हे तो जाणून होता. म्हणून त्याने तसे अर्धांगिनीस सांगून मांडवीला राजप्रासादातच राहण्याचा आदेश दिला. वास्तविक त्याच्या मातांच्या भोवती दासींचा मोठा ताफा होता. मांडवी प्रासादात नसण्याने सेवेत उणीव राहणार नव्हती. मांडवी त्याच्याकडे पत्नीचा हक्क न मागता सन्यस्त जीवन जगणार होती. तरी तिला राजप्रासादातच राहावे लागले. म्हणून मला काही प्रश्न पडतात...
मातृसेवा हे पुत्रकर्तव्य असल्याची जाणीव असलेल्या भरतास पतीकर्तव्याची जाणीव का नसावी? की रघुकुल रीत म्हणूनच न्यारी समजतात? या कुळातील पुरुष जबाबदारी सोपवण्यास हक्काची पत्नी हवी, यासाठीच लग्न करत? लग्नात घेतलेली 'नाति चरामि' ही शपथ त्यांच्या लेखी अर्थहीन वा केवळ उपचार असावी? निदान अर्वाचिन साहित्यिकांनी उर्मिलेचा तरी सहानुभूतीने विचार केला. मांडवीच्या वेदनांचा मात्र कुठे नामनिर्देश दिसत नाही. जणू ती राज प्रासादात मजेत होती, हे सर्वांनी गृहित धरले. खायला नि ल्यायला असण्यात स्त्रिने समाधान मानवे अशी या कुळाची नि समाजाची अपेक्षा असावी. नवरा हाकेच्या अंतरावर असून जिच्यासाठी आकाशीचा चंद्र ठरला त्या मांडवीसाठी आजही कुणी सहानुभूतीने विचार करताना दिसत नाही. रामायण जाणणारे लोकही मांडवीचा कुठेच उल्लेख करत नाहीत. तेव्हा समसंवेदनेची जाणीव मला व्यथित करते.
कदाचित कुणा संवेदनशील साहित्यिकाने तिच्याविषयी लिखाण केले असेल. पण मी तिथवर पोहोचले नसेन. असे असल्यास कुणा जाणकाराने ते इथे नमूद केले तर मला आनंद होईल. ब्लॉगच्या माध्यमातून मला हे ही विचारावेसे वाटते, की तुम्हाला कधी मांडवीने काय सोसले वा तिचे काय झाले, असे प्रश्न पडले का? की 'तिचं काय? ती राजप्रासादात भरजरी वस्त्राभूषणात सजून मजेत जगली' अशी खात्री वाटते तुम्हास?
रामायणाच्या संदर्भात विसाव्या शतकात झालेला अजून एक विचार आणि भाषा भगिनी गुजरातीत अंमलात आलेला एक परिणाम सांगायचा आहे. पण ते नंतर. तोवर मांडवीविषयी तुमचा विचार जाणण्यास उत्सुक आहे.
आभार.


I think they had prioritized duties at the time and noble ones were executing to that ideal. Perhaps Valmiki didn't see more to write about her role so left it at that. BTW, you should write 'Sitayana' (as a parallel universe to Ramayana to provide a woman's perspective)!
Very interesting point and thought provoking too.
रामायण घडलं त्रेतायुगात नि आपण जगतोय कलियुगात. मध्ये द्वापार युग होतंच. बदल होणारच. पण स्त्रीस देवता वगैरे म्हणणारे स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व नसावं नि ती फक्त पतीची सावली असावी, पतीसांगेल ते तिनं करावं, हाच विचार असल्यास तिला कार्येषु मंत्री म्हणण्याचा शहाजोगापणा कशाला हवा, हा विचार कुणी न करत नाही. तिला मन असतं हा विचारही न करणं मला कोणत्याही युगातअयोग्य वाटतं.
सध्या TV वर रामायण पाहत असताना आदर्श पुरुष आपण लेखत असलेल्या रामा च्या आदर्शवाद त्रासदायक ठरला. तसेच ह्या महा ग्रंथात असलेले वादा दित मुद्दे बरेच सापडले. शेवट मनाची समजूत घातली, सर्वांचे पाय माती चे. भरत च्या बायको चा उल्लेख सुदधा नाही कुठे. पुढचे वाचण्यास उत्सुक...👌👌👌